धरणगाव येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न
धरणगाव – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धरणगाव व धरणगाव शहरातील सर्व नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त वाद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात २०२ पशंटचे नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी साठी जळगाव येथील नेत्ररोग तज्ञ डाॅ सौ.रागीनी पाटील ह्या आल्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ किशोर भावे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा नायब तहसीलदार सातपुते, डाॅ मनोज अमृतकर, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक दुसाने तसेच विविध पतसंस्थेचे चेअरमन मंगलदास भाटीया, शिरीष बयस , प्रशांत केले,हेमंत जोशी,सुभाष भागवत,शाम काबरे मॅनेजर राजेंद्र महाजन,वासुदेव महाजन, उमेश चौधरी,वाल्मिक बागुल,प्रसाद कासार,किरण मराठे,गणेश माळी,बद्रीनाथ भाटीया,रविंद्र पाटील तसेच सुत्र संचालन किरण वाणी तर आभार दिपक चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पतसंस्थेतील कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.