धरणगाव शहरात प्रथमच महिला बचत गटा तर्फे वृक्षारोपण

धरणगाव प्रतिनिधी / योगेश पाटील
आज दि.०४ ऑगस्ट रोजी नगरपरिषद संचलित अशोक सुंदरी महिला बचत गटाने फळांच्या झाडांचे वृक्षारोपण करून एक सामाजिक संदेश दिला आहे. कार्यक्रमा प्रसंगी बचत गटाच्या सचिव सौ.मनीषा ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की शासन प्रशासन महिलांच्या आर्थिक उन्नती साठी नेहमी कटीबद्द असतात यामुळे आपणही समाजाचे काही देने लागतो म्हणून आम्ही स्वयं प्रेरणेने सामाजिक उपक्रम राबवून बचतगटात एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत.
तसेच बचत गट सदस्या सौ. शुभांगी ताई पाटील यांनी बचतगटाच्या भविष्यकालीन उपाययोजना सांगत भविष्यात धरणगाव नगरपालिकेचे व बचतगटाचे नाव विविध समजपयोगी कार्य करत अशोक सुंदरी महिला बचत गटाचे नाव राज्य पातळी पर्यंत पोहचू अशी या प्रसंगी भावना व्यक्त केली.* कार्यक्रम प्रसंगी बचतगटाच्या समुदाय संघटिका सौ. पुष्पा सैंदाने म्याडम व सी.आर.पी.सौ. दीपाली साळुंखे म्याडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच बचतगटाच्या अध्यक्षा सौ. मीना ठाकरे, उपाध्यक्षा सौ.आरती ठाकरे , सचिव सौ.मनीषा ठाकरे, सौ.संगीता ठाकरे, सौ.शुभांगी पाटील, सौ.कविता चौधरी, सौ.कविता निकम,सौ.लताबाई चौधरी, सौ.रत्नाबाई ठाकरे,सौ.मनीषा लोहार आदी कार्यक्रमास उपस्थित होते.


