नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे राज्यस्तरीय संघटक प्रचारक प्रशिक्षण शिबिर संपन्न
(जिल्हा संघटक पदावर गौरव आळणे यांची निवड)
नागपूर : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे राज्यस्तरीय संघटक प्रचारक प्रशिक्षण शिबिर नवनिर्माण न्यास, पारगाव सालोमालो, सेंद्रिय सेतु, पारगाव, तालुका दौंड जिल्हा पुणे येथे ८,९,१० जुलै २०२२ रोजी करण्यात आले. यावेळी शिबिराचे उद्घाटन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, नवनिर्माण न्यास संस्था चे संस्थापक अध्यक्ष वसुधाताई सरदार नशाबंदी मंडळाचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कार्यकारी समितीने गौरव आळणे यांची नागपूर जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी नशाबंदी मंडळाचे चिटणीस, मुख्य संघटक अमोल मडामे यांनी मंडळांची प्रस्तावना मांडली यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यसनमुक्ती धोरण २०११ या बद्दल मागदर्शन केले.
नवनिर्माण न्यास संस्था चे संस्थापक वसुधाताई सरदार यांची मुलाखत मार्फत चर्चा करण्यात आली यावेळी त्यांनी पारगाव गावात अशा प्रकारे दारू मुक्त गाव केल तसेच ३२ वर्षांहूनही ते गाव दारूमुक्त आहे व त्यांना त्याच्या जिवनात कशा प्रकारे कार्य केले आहे या बद्दल चर्चा करण्यात आली.
प्रचार, प्रसार, प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन दिप अर्चन चे संस्थापक संदिप नेमलेकर यांनी केले तर उपक्रम कौशल्य या विषयावर प्रा. प्रभा मॅडम यांनी घेतले तर सामाजिक कार्य चा अनुभव कथन नशाबंदी मंडळाचे खजिनदार अनिल हेब्बार , व्यसनमुक्ती उपचार समुपदेशन या विषयावर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र चे संचालक मुक्ता पुणताबेंकर यांनी केले.
या शिबिरात व्यसनमुक्ती ची शापसिडी, कौशल्य खेळ म्हणून परीचय खेळ, व्यसनमुक्ती खेळा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नशाबंदी मंडळाचे संघटक सुनिल चव्हाण, भिमराव गमरे, रवि गुरचळ तर रुपेश गि. री. यांनी संघटकाची मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.
अंमली पदार्थांचे विविध प्रकार या विषयावर मार्गदर्शन नवनिर्माण संस्था चे सल्लागार बॉस्को डिसोझा यांनी PPT मार्फत मागदर्शन करण्यात आले.
नशाबंदी मंडळाचे मुख्य संघटक यांनी भाषण कौशल्य स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ३० जिल्ह्यातील संघटकानी सहभाग घेतला आणि आपले व्यसनमुक्ती या विषयावर यांनी कौशल्य दाखवून तृतीय क्रमांक सांगली जिल्हा संघटक समीर गायकवाड, दुसरा क्रमांक महाराष्ट्र प्रचारक भिमराव गमरे तर प्रथम क्रमांक पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी पटकाविला. प्रशिक्षण शिबिरामध्ये चळवळीची गीते गौरव आळणे व राजेंद्र खोमणे यांनी गायली सूत्रसंचालन सुजाता सावंत तर आभार प्रदर्शन जालना जिल्हा संघटक बिस्मिल्ला सय्यद यांनी केले.
_________________________