नांदगाव तालुक्यातील परधाडी जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची हाणामारी
लोकनायक न्युज प्रतिनिधी – अनिल धामणे
नांदगांव – तालुक्यातील जिल्हा परीषद शिक्षक नरेंद्र ढोले यांच्या फिर्यादीवरुन, संशियत, आरोपी शिक्षक शांताराम बापु गवऴी, मुख्याध्यापक विकास उदय पवार शेखर गायकवाड़, सागर एंरंडे तसेच परस्पर एकमेकांच्या विरोधात गुंन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगाव पोलिस स्टेशन मध्य मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 836, अदखल पात्र 323, 504, 506 गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सिनेस्टाईल प्रमाणे फ्रिस्टाईल हाणामारी – शिक्षकच मारामारी करत असतील तर शाऴेत विद्यार्थी घडतील कसे ? येणारी पिढी ला काय संस्कार होणार ? हा नांदगाव तालुक्यात चर्चचेचा विषय बनला आहे. काही महिन्यापुवी एका मुख्याध्यापकाने खुन केला होता. आता उप शिक्षक यांच्यात मारामारी झाली आहे. शाळेच्या दि १९ रोजी परधाडी ता. नांदगांव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील बैठकीत मुख्याध्यापक आणि उप शिक्षक यांच्यात फ्रिस्टाईल हाणामारी झाली. या घटनेत स्थानिक मुख्याध्यापक आणी बाहेरील जिल्ह्यातील शिक्षक यांच्यात गावचे आणी उपरे असा वाद आहे ? त्यामुळे गावचे गाव बळी, परगावचे लोक बळी ! अशी स्थिती येथे दिसून येते . मुख्यध्यापाकांनी व उप शिक्षकाने एक मेकावर रूबाब न करता मुलांचे शिक्षणावर लक्ष देणे गरजेचे असताना परधाडी जि प शाळेवर दोन मास्तरा मधील फ्रि स्टाईल हाणामारी झाली. या शाळेवर तसा राजकिय हस्तेक्षेप बर्यापैकी वाढल्याचे मौखिक आहे. येथे शिक्षकामध्ये नेहमीच हमरी – तुमरी होत असते. हा वाद चार ते पाच वर्षा पासून आहे. येथे याच ञासाला कंटाळून काही शिक्षक बदलून गेले.
परधाडी जि प शाळेच्या सततच्या वादाच्या तक्रारी थेट गट शिक्षण अधिकारी नांदगांव यांचे कडे वेळो वेळी झालेल्या आहेत .पण त्यात काही ठोस पर्याय निघताना दिसत नाही. शिक्षक राजरोस पणे खुले आम शाऴेच्या वेऴेत ग्रैर हजर राहुन, जमीन खरेदी विकी व्यवसाय करतात. चार शिक्षका पैकी एक शिक्षक हजर राहतो, बाकी चे शिक्षक शासकीय कार्याल्यात शाऴा सोडून राहतात. यावर गट शिक्षण अधिकारी मौन व्रत धरुन दिसत आहे. “शेतच कुपंन खाते” असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कारणावरुन वाद पेटतोय. पुढील तपास सहायक पोलिस उप निरीक्षक प्रविण मोरे पोलिस शिपाई संदीप बोडके हे करत आहे.