ताज्या बातम्या

नागरिकांना पाणी पाजणाऱ्या धरणगांव नगरपरिषदेतच पाण्याचा ठणठणाट

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

धरणगाव – येथील नगरपरिषद मध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्यात तीव्र उष्णतेत तापमान 40 अशांवर पोहचले आहे. धरणगांव नगरपरिषदेत दररोज शेकडो नागरिक कामानिमित्त येत असतात. अधिकारी  व नगरसेवक यांना तर पाण्याच्या जार ने तहान भागते, परंतु इतर कर्मचारी व नागरिकांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. 35000 हजार लोकसंख्या असलेल्या नगरपरिषद मध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांमधुन प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः कर्मचारी व नागरिक यांनाही याचा फटका बसत आहे. तरी नगरपरिषदेत जलमंदिर उभारण्यात यावे आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *