नाशिक-महात्मा फुले नगर खारीफाटा येथे दुकाने फोडून ४० हजारची रोकड चोरट्यान कडून लंपास ; परीसरात भितीचे वातावरण
दहिवड प्रतिनिधी – आदिनाथ ठाकूर
देवळा – तालूक्यातील खारीफाटा येथे मध्ये रात्रीच्या सुमारास ३ ते ४ दुकाने टामी च्या साह्याने पत्रे उचकवत चोरट्यांनी ४० हजार रुपयांची रक्कम लंपास केली.
हा प्रकार ३० जुलै च्या रात्री खारीफाटा भागात घडला. असून याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात चोरट्या विरुद्ध चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धोबी घाट येते गुंजाळ चहा दुकानावर चोरी झाली होती याचाही तपास पोलिसांना लागला नाही यानंतर लगेच खारी पाडा येते चोरी झाली
याप्रकरणी रोशन शिरसाठ यांचे शेतकरी आमृत तुल्य व आडत दुकानाच्या ड्राँव्हर मधून २० हजार ,तर आमोल सोनवणे गुरूकृपा टँक्टर गँरेज मधून ५ हजार तर किरण सोनजे यांच्या कृषीे स्वराज्य दुकानातून १२ ते १४ हजार तर काही साहीत्य चोरीस गेले असून त्यांनी सदर घटनेची तक्रार देवळा पोलीसात केली आहे.
रात्री दहा वाजता दुकान बंद करून घरी गेल्यानंतर आज रवीवारी सकाळी ह्या चोरीच्या प्रकरणाची घटना उघडकीस आली दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे पत्रे उचकवून आत घुसून ३५ ते ४० हजार रुपयांची रोक रक्कम लंपास केली आहे
सदर या परीसरात ८ दिवसापुवी हि चोरी झाली असुन गुन्हेगाराना कुणाचाच धाक राहीला नसून आज हि सर्रस पणे दुकाने फोडली जात आहेत कर दुकानातील रोकड घेऊन चोरटे पोबारा करत आहेत..तर परीसरात व व्यावसाहिका न मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे ..
तर देवळा पोलीसानी ह्या गोष्टी कडे कटक्षाने लक्ष देउन रात्री गस्त वाढवावी व लवकर चोरट्याचा छेडा लावून आटक करावी अशी जोरदार मागणी परीसरातून होत आहे
तक्रारीवरून देवळा पोलिस ठाण्याचे उप निरीक्षक कचरे व मोरे यांनी घटनास्थळी पोहचून परीस्थितीची पहाणी करुन पंचनामा केला आहे. तर देवळा पोलीस ठाण्याचे Api दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनातून पुढील तपास सुर आहे.