ताज्या बातम्या
पष्टाणे येथे अजिंक्यक्रांती फाऊंडेशनतर्फे गरजूंना वह्या व पुस्तके वाटप
धरणगाव – तालुक्यातील पश्ताने येथे आज रोजी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष चि.अक्षय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजूंना वह्या, पुस्तके, पेन वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पष्टाणे गावाचे माजी आदर्श सरपंच श्री किशोर दादा निकम, अजिंक्यक्रांती फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष संदीप जाधव व आमचे मार्गदर्शक शुभम दादा ठाकरे तसेच अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे कार्यकारणी सदस्य जुग्नेश पाटील, विवेक जाधव, ज्ञानेश्वर निकम, अनिल पवार, रुपेश वाघ, यश निकम, भावेश निकम, निखिल निकम, संदिप पवार, पंकज पाटील, गणेश जाधव, चेतन पाटील, मयूर मराठे, आकाश नाईक, आकाश भिल आदी यावेळी उपस्थित होते.