ताज्या बातम्या
पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याशी बेघर अतिक्रमण घर नावावर करण्यासंदर्भात चर्चा करताना शिष्टमंडळ
धरणगाव शहरातील 1757 बेघर अतिक्रमण असलेल्या नागरिकांच्या नावावर सिस नंबर लावण्याचा संदर्भात बेघर अतिक्रमण संदर्भात समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत घर नावावर व्हावीत सर्वांच्या प्रयत्नातून यासाठी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बालाजी मंदिरापासून सर्व नागरिक महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत. त्यादिवशी पालकमंत्री सुद्धा यावेत यासाठी शिष्टमंडळांनी त्यांच्याशी चर्चा केली.
या प्रसंगी अँड वसंतराव भोलाणे,रवींद्र कंखरे,माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,तिळवण तेली समाजाचे नेते संजय चौधरी उपस्थित होते.