ताज्या बातम्या

प्रभागांमधील उलटफेर मुळे प्रस्थापितांसह इच्छुकांना धक्का

विनोद रोकडे धरणगाव

धरणगाव नगरपालिकेच्या ११ प्रभागांची प्रारूप रचना सोमवारी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामनिवास झंवर यांनी जाहीर केली. प्रारूप रचनेत मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याने प्रस्थापितांनाही धक्का बसला असून इच्छुकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर आरक्षण सोडत कधी व कशी निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.धरणगाव येथे बहुचर्चित प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आल्याने प्रभागांचे चित्रही स्पष्ट झाले आहे. त्यानुसार धरणगाव नगरपालिकेचे ११ प्रभाग असून १ ते ११ प्रभागातून दोन नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. तर प्रभाग क्रमांक ११मधून ३ नगरसेवक निवडून द्यायचेआहेत. या प्रमाणे एकूण २३ जणांना पालिकेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. यात प्रभाग क्रमांक ११ हा सर्वात मोठा तर प्रभाग क्रमांक ४ हा लोकसंख्येचा सर्वात लहान प्रभाग ठरला आहे. दरम्यान, धरणगाव पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणावर उलटफेर झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे : पालिकेची निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुकांसह प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे*आरक्षण सोडती कडे लक्ष*आरक्षण लवकरच जाहीर होणार असून त्यानंतर कोणत्या इच्छुकांचा पत्ता कट तर कोणा इच्छुकाला लॉटरी लागणार, हे ठरणार आहे. प्रभाग रचनेला हरकतीनंतर अंतिम स्वरूप मिळाल्यावर कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण निघते व नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काय निघते, याकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले आहे. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांसाठी आरक्षण जाहीर झाल्यावर खऱ्या अर्थाने इच्छुक कामाला लागतील. कोणाचा पत्ता कट होऊन कोणाची लॉटरी लागेल हे आरक्षण ठरवेल. त्यामुळे आरक्षणाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.*हरकती व सूचनांसाठी ३१ आगस्टपर्यंत मुदत* धरणगाव नगरपालिकेची एकूण सदस्य संख्या २३असून १ ते १०प्रभागातून २ सदस्य तर प्रभाग ११ मधून ३ सदस्य असे एकूण ११प्रभागातुन २३ सदस्य निवडून येणार आहेत. कोणत्या प्रभागात कोणता भाग समाविष्ट आहे, हे स्पष्ट झाले आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनांबाबत हरकती व सूचना ३१ ऑगस्टपर्यंत मागवण्यात येणार आहे. तर ३० आणि ३१ ऑगस्टला सुट्टी असून ही हरकती स्वीकारल्या जातील, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. तर आलेल्या हरकतींवर १ ते ८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाधिकारी सुनावणी घेतील. तर ११ सप्टेंबरपर्यंत अंतीम प्रभागरचना नगरविकास विभागाकडे सादर होवून ३० सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोग अंतीम प्रभागरचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *