ताज्या बातम्या

बांधकाम करतांना झाडे लावणे व रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक करा.अन्यथा परवानगी देऊ नका-दिशा फाउंडेशनची निवेदनातून मागणी

प्रतिनिधी विनायक पाटील

नगरपालिका हद्दीतील कोणतीही बांधकाम परवानगी देताना बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने दोन झाडे लावणे व रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक करावे अन्यथा बांधकाम परवानगी देऊ नये.अश्या आशायाचे निवेदन दिशा फाउंडेशनच्या वतीने दि 22 रोजी चोपडा पालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहॆ की,
सध्या सगळीकडे हवामान बदलाची चर्चा असून त्याचे प्रत्यक्ष चटके मानव जातीला बसत आहॆ.
पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे तरीही पर्यावरणाची हेडसांड होताना आपल्याला दिसत आहॆ.त्यामुळे अनेक समस्यांना मानव जातीला सामोरे जावे लागत आहे. आपण एक सुजाण व जागृत नागरिक म्हणून पर्यावरण संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून निवेदनाद्वारे दिशा फाउंडेशन पालिकेला आवाहन करते की, नगरपालिकेद्वारे यापुढे कोणत्याही बांधकामासाठी परवानगी देताना काम करणाऱ्या व्यक्तीने किमान दोन झाडे व रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य करण्यात यावे. त्याशिवाय बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये.अशी मागणी निवेदनातून दिशा फाउंडेशनने पालिकेला केली आहॆ.यावेळी दिशा फाउंडेशन अध्यक्ष पंकज पाटील, संचालक पंकज शिंदे,अब्दुल हक,अस्लम अली, सनी सचदेव,सदस्य अक्षय वैद्य,लोकेश चौधरी, निलेश महाजन,पवन पाटील, विवेक पाटील,विश्वजीत गुरव, विशाल गुरव, भूषण पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *