बी.एस.एन.एल.ची ब्रॉडबॅन्ड सेवा ठप्प ; ग्राहकांचा मनस्ताप

धरणगांव – गेल्या काही दिवसांपासून बी.एस.एन.एल.ची ब्रॉडबॅन्ड सेवा विस्कळीत झाली असून ग्राहकांचा नाहक मनस्ताप होत आहे. मागील 15 दिवसांपूर्वी सेवा अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने दिवसभर सेवा बंद होती. तर सिस्टम अपग्रेड होवून ग्राहकांना अधिक वेगवान व सरल सेवा मिळेल या हेतूने ग्राहकांनी एक दिवस आपली दुकाने बंद ठेवलीत. मात्र यामुळे दिवसभर धरणगांव शहराची आर्थिक घडी विस्कळल्याचे दिसून आले. सदर ची परिस्थिति ही शहरपूरती मर्यादित नसून संपूर्ण जळगांव जिल्ह्यात अशीच परिस्थिति असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
सेवा सुरळीत होईल ही ग्राहकांना अपेक्षा होती मात्र याउलट गेल्या 15 दिवसांपासून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून अधून मधून सेवा मिळत नसल्याने तसेच सेवेत खंड निर्माण होऊन ब्रॉडबॅन्डची गती ही कमी होत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. तर दुसरिके जिओ फायबर वेगाने आपली स्पर्धा बी.एस.एन.एल.शी करीत असल्याने जिओ ला वाढविण्यासाठी बी.एस.एन.एल.च्या अधिकाऱ्यांची काही मिलिभगत आहे का ? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
तसेच डाउनलोडिंग स्पीड एखाद वेळी चांगला असला तरी अपलोडिंग स्पीड मात्र मिळत नाही. गेल्या 15 दिवसांपासून अपलोडिंग स्पीड हा नसल्याप्रमाणे आहे. त्यापेक्षा मोबाइल डाटा चा स्पीड तरी चांगला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सदर संदर्भात धरणगांव तालुक्याचे मुख्य अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केली असता, “ आम्ही याबाबत विरिष्ठांना माहिती दिली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आज मंगळवार रोजी पुन्हा बी.एस.एन.एल.ची ब्रॉडबॅन्ड सकाळ पासून विस्कळीत होती तर दुपरून तर सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून आले. तर यासाठी जबाबदार कोण ? अधिकारी योग्य उत्तर देईनात आणि तक्रारीचे निरसन देखील होईना अशी परिस्थिति निर्माण झाली आहे.