महाकाल ग्रुपच्या वतीने भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न
चोपडा प्रतिनिधि / विनायक पाटील
लासूर ता.चोपडा : सदर स्पर्धा गावातील सातपुडा स्टेडियम येथे पार पडल्या असून चोपडा तालुक्यासह शिरपूर,अमळनेर येथील संघांनी देखील यात सहभाग नोंदविला होत सदर स्पर्धेत विजेत्या संघांना प्रथम पारितोषिक चोपडा पंचायत समितीचे माजी उपासभापती एम व्ही पाटील सर यांचे कडून रु १५५५५/-, द्वितीय पारितोषिक शबरी आदिवासी मजूर सोसायटी चेअरमन दिपक पटाईत, व कि. शि वि प्र संचालक विजय कोळी रु १११११/- यांचेकडून, तृतीय पारितोषिक कॉन्ट्रॅक्टर लोटन कुमावत यांचे कडून रु. ७७७७/- ,तसेच चतुर्थ पारितोषिक दिपक बेलदार यांचे कडून रु ५५५५/- देण्यात आले तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व व्यावसायिक यांचे कडून वैयक्तिक बक्षीस देण्यात आली होती.
सदर स्पर्धेत चोपडा येथील जय हिंद गणराया क्रिकेट क्लब विजेता संघ ठरलां असून उपविजेता संघ महाकाल किकेट क्लब तसेच साई अकेडमी चोपडा व जय नारायण चोपडा या संघाना पारितोषिक देणगीदाराच्या माध्यमातून महाकाल ग्रुपचे सर्व सदस्यांनी दिले स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.