महात्मा फुले विद्यालयात बाल कलाकारांनी शाडू माती, क्ले पासून बनविल्या श्री गणेशाच्या आकर्षक मुर्त्या

परभणी / महात्मा फुले विद्यालय, गणेश नगर शाखेमध्ये आज दिनांक 26-8-2025 रोजी बाल कलाकारांनी शाडू माती, रंगिबेरंगी क्ले व स्पंज क्ले पासून भगवान श्री गणेशजी च्या आकर्षक मुर्ती बनविल्या. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळे मध्ये उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गणेश नगर शाखेतील सौ.समृध्दी मस्के मॅडम व सौ.वर्षा पारवे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.या शिबिरात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडूच्या मातीपासून गणपती तयार केले.स्वतः च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती बनवताना मुलांच्या मनात श्रद्धा व बाप्पा विषयी प्रेम पाहायला मिळाले.महात्मा फुले विद्यालय नेहमी कृतीयुक्त शिक्षण देऊन मुलांचा सर्वांगीण विकास करणारी परभणी येथील एकमेव शाळा आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री रमेशराव नाईकवाडे सर यांचे नेतृत्वामध्ये श्री जाधव सर श्री वीरशे सर श्री प्रदीप चव्हाण सर श्री गहाळ सर श्री रांनगिरे सर श्री यवतकर सर श्री अमोल सर श्री तांबोळी सर श्री जुकटे सर श्री चापके सर श्री तोंडचिरे सर श्री सोळंके सर श्रीकांत सर श्री राठोड सर श्री किसन समिद्रे यांनी प्रयत्न केले.गणपती बाप्पा मोरया च्या घोषणानी शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता.