जळगांव जिल्हा
महाराष्ट्र मराठा फाउंडेशन सकल मराठा समाजातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार
जळगाव – महाराष्ट्र मराठा फाउंडेशन सकल मराठा समाजातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय माननीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजावंदनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाराष्ट्र मराठा फाउंडेशन सकल मराठा समाज अध्यक्ष अँड बापूसाहेब जाधव कोर कमिटी प्रमुख विजय दादा पोकळे प्रदेश उपप्रमुख पी एम पाटील सर यांनी मंत्री महोदयांच्या सत्कार केला व मराठा समाजाच्या विविध मागण्या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील व पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते.