रथ व वहनोत्सवात सामाजिक सलोखा राखावा – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
घटस्थापने पासुन सुरु होत असलेल्या श्री बालाजी वहन व रथ उत्सव उत्साहात शहरातील नागरीकांनी सामाजिक सलोखा राखावा व सर्व समाज बांधवांनी एकत्रीत येऊन ह्या धार्मिक उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करुन वहन मिरवणुकीत रथ व शेवटचे पांडव सभेच्या वहनाची बारा वाजेपर्यंत वाजंत्री मिरवणुकची परवानगी मिळवुन देण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.
नुकतीच येथील श्री बालाजी मंदिराच्या सभागृहात रथ व वहन उत्सवा निमित्त झालेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत जिह्याचे पालकमंत्री महोदयांनी विविध शासकीय अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, बैलजोडीधारक यांच्या सोबत शांतता समितीची बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पालिकेचे मुख्यधिकारी रामनिवास झंवर, विज मंडळाचे कनिष्ठ अभियंता सराफ साहेब, तसेच मंडळाचे अध्यक्ष डि.आर.पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जिर्णोद्धार समितीचे जिवन आप्पा बयस, मंडळाचे सदस्य सुरेश चौधरी आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख अतिथींचा सत्कार मंडळाचे सदस्य पंडीत गुरुजी, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, पांडुरंग मराठे, संतोष सोनवणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष डि.आर.पाटील यांनी प्रास्ताविक करतांना वहन मिरवणुकीची सुरवाती पासुन तर आजतागायत ची माहीती सादर केली. ते म्हणाले की हा उत्सव आपला गांवाचा असुन या उत्सवाच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वहन मिरवणुकीची वेळ वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावेत व जिल्हाधिकारींशी या बाबत चर्चा करून गांवातील नांगरीकाचा श्रध्दा व भावनेचा आदर ठेवून मिरवणुक वेळ वाढवून देण्याचे सहकार्य करावे असे आवाहन केले. पी आय सुनील पवार यांनी वहन व रथ उत्उसवात तरुण पिढी युवा वर्गाने भावनेच्या आहरी न जाता शांतता व सुव्यवस्थेसाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित असल्याची जाणीव करून दिली. मुख्यधिकारी रामनिवास झंवर यांनी वहन मिरवणुकीत कोणतेही अडथळे येणार नाही यांची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले. तर विज मंडळाचे कनिष्ठ अभियंता सराफ साहेब यांनी वहन उत्सवाचा पुर्ण पंधरवाडय़ात विजेचा लंपडाव होणार नाही व सर्वत्र सुरळीत विज पुरवठ्याची हमी दिली.
सदर चर्चेत गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे, अॅड संजय महाजन, भागवत चौधरी, अॅड भोलाणे यांचेसह विविध पदाधीकारींनी सहभाग घेत, वहन उत्सव हा आपला गांवचा असुन सुरळीत पार पाडण्याची जवाबदारी आपल्या सर्वाची असल्याचे नमुद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मंडळाचे सचिव प्रशांत वाणी यांनी केले. कार्यक्रमा प्रसंगी मंडळाचे जेष्ठ सदस्य डि.जी.पाटील, हेमलाल भाटीया, आधार चौधरी, प्रमोद जगताप, विलास येवले, भालचंद्र वाणी इत्यादी सह मंडळाचे सदस्य, बैलजोडी धारक, पत्रकार व नागरिक आदि उपस्थित होते.


