ताज्या बातम्या

रायबा ग्रुप 555 तर्फे साड्या व स्मृतिचिन्ह वितरण

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

धरणगाव – तालुक्यातील पष्टाने बुद्रुक गावातील रायबा ग्रुप 555 गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव दरम्यान झालेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यामध्ये महिलांना साड्या व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्वप्रथम हस्ते गणरायाची झाली त्यानंतर विविध बक्षीसांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये निंबू चमचा, संगीत खुर्ची इ. विविध स्पर्धेत जिंकलेल्या ज्ञानेश्वर पाटील, हितेश पाटील, समर्थ पाटील, यश पाटील, भावेश पाटील, रुद्र ठाकरे, जान्हवी शिंपी, सायली पाटील, तनु पाटील, प्राची पाटील, कुणाल पाटील, स्वामी ठाकरे यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सामान्य बुद्धिमत्ता स्पर्धेमध्ये जिंकलेल्या महिला उज्वला जाधव, सिमा जाधव, मनिषा जाधव, जयश्री पाटील, शितल शिंपी यांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा उबाठा युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, एकनाथ पाटील, अमित शिंदे, मोहीत पवार, अरविंद चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य जाधव तसेच माजी उपसरपंच शरद जाधव, रायबा ग्रुप 555 चे अध्यक्ष विवेक जाधव, गावाचे पोलीस पाटील संजय ठाकरे, ईश्वर ठाकरे, सुरेश जाधव, जानकिराम पाटील, राजेंद्र जाधव, भास्कर पाटील, विजय शिंपी, सुपडू शिंपी, व्ही डी पाटील, भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर जाधव, प्रविण ठाकरे, सौरभ ठाकरे, शिवम पाटील, धिरज पाटील, गणेश जाधव, भावेश पाटील, योगेश जाधव, कुंदन पवार, भूषण जाधव, रामू ठाकरे, रामकृष्ण शिंपी, दिनेश ठाकरे, हितेश पाटील, बाबा शिंपी यांच्यासह रायबा ग्रुप 555 गणेश मित्र मंडळ पष्टाने बु च्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अजिंक्य जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *