ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबार रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण

नंदुरबार – स्वच्छता पंधरवड्याचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे सामाजिक बांधिलकी जपत नंदुरबार रेल्वे स्थानक व स्थानकाच्या परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. तसेच स्वच्छता बाबत जनजागृती देखील करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा नेहमीच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात उपक्रमशील सहभाग असतो. त्या अनुषंगाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमात नंदुरबार रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक सुधीर चव्हाण, आर.पि.एफ.चे पोलिस निरीक्षक बसंत राय, रोटरी क्लबचे सचिव रो.राहुल पाटील, रो. राजनसिंह चंदेल, रो.महेश रघुवंशी, रो.राजेश्वर चौधरी, नंदुरबार रेल्वे स्थानकाचे संजिवकुमार, संदीप कुमार, जितेंद्र मीणा व इतर स्टेशन स्टाफ तसेच स्वच्छता कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन जबाबदारी पार पाडली आणि स्थानिक प्रशासनानेही सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *