वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण यांनी केलेल्या बोगस कामांची चौकशीची महेश गायकवाड यांची मागणी

हिमायतनगर – तालुक्यातील सरसम, पोटा ह्या परिमंडळमध्ये सन २०२२ ते २०२५ पर्यंत करण्यात आलेली बोगस कामाची खातेनिहायत चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी ओ.बी.सी.सेलचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी वनविभागास दिले. हिमायतनगर तालुक्यातील सरसम, पोटा, वनपरिमंडळमध्ये सन २०२२ ते २०२५ ह्या आर्थीक वर्षात करण्यात आलेली कामे डिपसिटी, माती बंधारा, प्लानटेशन, बॉडी प्लेअर, वनतळे, सीसीटी, वृक्षलागवड, टिसीएम, मनरेगा, म.ग्रा.रो.ह.यो., वनचर, रोपवन, जाळीचे बांध, बुरूज ह्या कामासाठी शासना मार्फत आलेला निधी हा तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण, वनपाल सुनिल मेटकर, वनरक्षक केंद्रे यांनी अर्धवट बोगस कामे करून शासनाच्या निधीचा अपहार केला असल्याने त्यांनी केलेल्या कामाचे फिल्डबुक, वर्क रजिस्टर, मापन पुस्तीका, कॅशबुक, रक्कम उचलण्याची मान्यता, नियमा प्रमाणे झाले आहे का ? या कामांचे गुन्हे अन्वेशन विभागामार्फत मार्फत चौकशी करावी अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे.


