वाघोड ला रथोत्सव उत्साहात, रेवड्यांची झाली उधळण

रावेर प्रतिनिधी / कमलेश पाटील
रावेर तालुक्यातील वाघोड येथे श्री कुंवर स्वामी राम रथोत्सव हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की, कुंवरस्वामी महाराज की जय, अशा भक्तीच्या जयघोषात व रेवडी… रेवडी…ची आर्त हाक देत, रेवड्यांच्या उधळणीने वृध्दिंगत झालेल्या अपूर्व उत्साहातील पुष्प वेलीच्या माळांनी सुशोभित केलेल्या श्री कुंवरस्वामी महाराज रथाला ओढत 131वी नगरप्रदक्षिणा मोठ्या भक्तिभावने शनिवारी पुर्ण केली.
संध्याकाळी साह वाजेच्या सुमारास पुजेला सुरवात करण्यात आली तालुक्यातील विद्यमान आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते रथाची आरती करण्यात आली यावेळी वाघोड चे सरपंच संजय मशाने माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील मंदीराचे पुजारी चंद्रकांत दिक्षित व दिनेश दिक्षित यांच्या हस्ते महाभिषेक व महापुजा करण्यात आली. तदनंतर भजणी मंडळीनी ताल मृदुंग वाद्यांचा गजर करीत कुंवर स्वामी महाराजांच्या समाधी स्थळांना प्रदर्शना करत रथ ओढण्यात आला शिवाजी चौक ते बारी वाड्यातून मोठ्या माळी वाडा मार्गात वरून ते सावतामाळी चौक ते कारगिल चौक ते राम मंदिर असा मार्गस्थ होत जवळजवळ चार तासांनी 131वी नगरप्रदक्षिणा पुर्ण करण्यात आली .
यावेळी रथाला दिशा देण्यासाठी मोगरी लावण्याचे सेवा सिताराम तुकाराम महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन यशवंत चौधरी, रामकृष्ण विश्वनाथ पाटील, यांनी बजावली. यावेळी रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील यांनी चोख बंदोबस्त राखला.