ताज्या बातम्या
शिवजन्मोत्सव निमित्ताने वाघोड येथे जाहीर व्याख्यान

रावेर प्रतिनिधी / कमलेश पाटील
रावेर तालुक्यातील वाघोड येथे दिनांक 15 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसा निमित्ताने जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. वाघोड येथील शिवाजी चौक येथील शिपप्रेमी यांनी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव निमित्ताने रात्री 8 वा ते 10 वा दरम्यान र्शिवव्याख्याते प्रेरणाताई भोसले यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे तरी आयोजोकांनी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच शिव प्रेमी यांनी व्याख्याना ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.