ताज्या बातम्या

‘संघाचे सेवाकार्य-समाजाला प्रेरणदायी-राजेश पाटील

धरणगांव- समाज व्यवस्थेत रा स्व संघाने आपल्या विविध सेवाभावी प्रकल्पातुन चालविलेले विविध कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन रा स्व संघाचे जळगांव विभाग संघ चालक राजेश नामदेवराव पाटील यांनी धरणगाव च्या कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केलेनुकत्याच येथील क्रांतीकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलीत कै डॉ टी. डो कुडे आरोग्य सेवा केंद्र व स्वामी विवेकानंद बालसंस्कार केंद्र व अभ्यासिका यांचा उद्‌घाटनचा कार्यक्रम संपन्न झाला त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून ते बोलत होते व्यासपिठावर संघाचे देवगिरी प्रांत ,कल्याण आश्रमचे अध्यक्ष, चैत्रामजी पवार, जिल्हा सेवा मंडळाचे सदस्य डॉ चेतन’भावसार, संस्थेचेअध्यक्ष भाईदास सोनवणे तालुका संघचालक मोहन चौधरीसर आदी उपस्थित होते . प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आरोग्य सेवा केंद्राचे, व बालसंस्कार अभ्यासिकेचे उद्‌घाटन करण्यात आले व प्रमुख मान्यवराचा संस्थेचा वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करवात आला प्रारंभी प्रास्ताविकात संस्थेचे सचिव विलास महाजन यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व रा. स्व. संघाचा माध्यमातुन उभारलेल्या सेवा प्रकल्पाची माहीती देऊन प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिलाकार्यकमा प्रसंगी चैत्राम पवार यांनी संघकार्याची माहीती देतांना संघाने सेवा भावनेतुन चालविलेल्या विविध कार्यामुळे संघ सर्व समाजापर्यंत पोहचत असुन संघाचे संघटन दिवसेंदिवस वाढत असल्याची जाणीव करून दिली . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ललीत उपासनी यांनी केले तर आभार वाय पी पाटील यांनी मानले कार्यक्रमात सेवा कार्यात सहभागी झालेल्या विविध दात्याचा व सेवा केंद्रासाठी भरीव मदत केलेल्या दात्याचा गौरव करण्यात आला त्यात प्रविण भाऊ कुडे,कैलास माळी सर, पप्पु भावे, आर्किटेक्ट सुनिल शहा यांचा समावेश होताकार्यक्रमा प्रसंगी समरसता मंच गतिविधीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आर एन महाजन,पश्चिमक्षेत्र कार्यवाह रा. स्व. संघ बालुअण्णा चौधरी.डी आर पाटील.किशोर चौधरी.उद्योजक नयनशेठ गुजराथी.डाॅअसोसिएशन चे अध्यक्ष मिलिंद डहाळे. डाॅ अरुण कुळकर्णी. डाॅ किशोर भावे.डाॅ पंकज अमृतकर डाॅ गणेश माळी.डाॅ पुष्कर महाजन.डाॅ सुचित जैन.डाॅ शैलेद्र सुर्यवंशी. सर्व मेडीकल प्रतिनिधी. बाजार समितीचे उपसभापती संजय पवार वराड.संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे.उपाध्यक्ष यशवंत कुवर.सदस्य संजय यादव सोनवणे.शिवदास भिल.सुखदेव सोनवणे.आदि उपस्थित होते.सदर कार्यक्रमात वैजापूर तालुका चोपडा येथील सरपंच दत्तरसिंग सुभाष पावरा यांचा विषेश सत्कार करण्यात आला.वैजापूर येथे ग्रामसभा घेऊन धर्मांतरीत आदिवासीना मुळ धर्माच्या सवलती घेता येणार नाहीत असा ठराव मंजुर केला.त्यामुळे ख्रिश्चनि करणास आळा बसावा म्हणुन त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान व्हावा म्हणुन त्याचा विषेश गौरव करण्यात आला . प्रसंगी परीसरातील असंख्य नागरीक उपस्थित होते.सर्व स्वयंसेवकांचे सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *