जळगांव जिल्हा

संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करा : समस्त माळी समाज व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघाचे निवेदन

लोकनायक न्युज प्रतिनिधी, लतीश जैन

चोपडा – महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू भिडे चा तीव्रनिषेध शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख मनोहर कुलकर्णी (भिडे) यांनी जय भारत मंगल कार्यालय अमरावती येथील कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबाबत अशोबनीय वक्तव्य केले आहे. थोर समाज सुधारकांविषयी वादग्रस्त विधान करून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था बिघाडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी..

भिडे यांनी महात्मा फुले यांच्या विषयी केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे फुले अनुयायांच्या भावना दुखावले गेले आहेत. त्यांच्याकडून वारंवार होत असलेल्या अशा वक्तव्यामुळे अशा व्यक्ती यामुळे देशात जातीय तीळ निर्माण होऊन अशांतता निर्माण होण्याची भीती आहे. शासनाने भिडे चा ताबडतोब बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी श्री एकनाथ बंगाळे साहेब चोपडा यांना देण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित चित्रा माळी, संध्याताई माळी, माया माळी, नानासो ए.के.गंभीर सर,पी. एस. महाजन, के. एस. महाजन, एन. व्हि. महाजन, एस. एस. महाजन, कैलास माळी, नवल महाजन, नरेश महाजन, नंदू माळी, समाधान महाजन, योगेश महाजन चहार्डी, अरुण महाजन, हरीश माळी, प्रवीण मगरे, राजेंद्र माळी, संजय महाजन, लालचंद माळी, लखीचंद माळी, योगेश महाजन, सचिन महाजन,मीना माळी, माया माळी सुभाष माळी,बस्कार सर, चंद्रकांत महाजन शांताराम माळी, जितेंद्र महाजन लक्ष्मण माळी समाधान माळी महेंद्र महाजन अल्केश माळी नरेंद्र महाजन रोहित माळी राजेंद्र माळी अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि चोपडा तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच समस्त माळी समाज पंचमंडळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *