सत्यशोधक समाज संघाच्या वतीने ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !

धरणगांव प्रतिनिधि – विनोद रोकडे
धरणगांव – भारतीय संविधानाचे निर्माते, विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, सत्यशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त धरणगाव येथे ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन करण्यात आले.
अभिवादन प्रसंगी जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांनी विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने उद्बोधन केले. याप्रसंगी ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, माळी समाज पंच हेमंत माळी, आदर्श शिक्षक कैलास पवार, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, मेहतर समाज पंच सुरज वाघरे, राजेंद्र भाटिया, पत्रकार निलेश पवार, परीट समाजाचे शहराध्यक्ष विनोद रोकडे, नयन वाघरे, अर्जुन पचेरवार, प्रा.आकाश बिवाल, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.