सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यावर निवड ; विभागीय स्पर्धेत मिळवले यश
चोपडा प्रतिनिधी / विनायक पाटील
एकात्मिक आदिवासी विकास विभाग नाशिक आयोजित क्रीडा स्पर्धांचे नाशिक येथे गेल्या 29 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते. दरम्यान सनपुले आश्रमशाळेच्या नऊ खेळाडूंची प्रकल्प स्तरावर निवड झाली होती ज्यांना विभागावर संधी मिळाल्याने त्यातील नऊ खेळाडूंपैकी तीन खेळाडू राज्यावर निवडण्यात आले आहेत.अर्जुन हिरालाल बारेला(उंचउडी),सयाराम मन्साराम बारेला(४×१००रीले),अनिल बद्री भिलाला (४×४००रिले) अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत.आदिवासी विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात खेळामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसन होण्याला मदत होईल अशी भावना एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प यावल कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुणजी पवार यांनी भावना व्यक्त केली. राज्यावर निवडीबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील व सचिव गणेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.