ताज्या बातम्या
सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात माहिती अधिकार सप्ताह निमित्त निबंध स्पर्धा संपन्न
धरणगाव – येथील सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात शासन निरदर्शीत केलेला 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर “माहीती अधिकार” सप्ताह निमित्ताने शाळेत माहिती अधिकार हा विषय घेऊन भव्य निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेतील खूप विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धास्थळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील व प्राथमीक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी भेट दिली. या प्रसंगी जेष्ठ शिक्षक डी आर चव्हाण व स्पर्धा प्रमुख सचिन देसले व सहाय्यक सागर पाटील आदी शिक्षक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.