ताज्या बातम्या

सेंट मेरी पब्लिक स्कूल,टोळी येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस म्हणजे आपल्या राष्ट्राच्या हृदयात कायम जळणाऱ्या अभिमानाच्या ज्योतीचा दिवस…

धरणगांव प्रतिनिधी / विनोद रोकडे

सेंट मेरी पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण धरणगाव येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष, झेड आर यु सी सी मेंबर पश्चिम रेल्वे, खान्देश प्रवासी असोसिएशनचे खजिनदार प्रतिक विरचंद जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत देशभक्तीपर गीतांवर डान्स तसेच, उरी, सर्जिकल स्ट्राइक, पैलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर व विविध देशभक्तीपर नाटकांचे सादरीकरण केले. बासरी वादन करीत देशभक्तीपर गीत सादर केले, व नंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रतिक जैन तसेच चावरा आश्रम शाळा अमळनेरचे आ..fr. जॉन् सर, लोकल मॅनेजर आ. प्रमिता मॅडम, प्रिन्सिपल आ.Sr. पेप्सी मॅडम, व्हॉइस प्रिन्सिपल आ.मनीषा मॅडम, इन्चार्ज हर्षद चौधरी सर, जेसडीन जॉर्ज सर, वैभवी डहाळे मॅडम, मनीषा जैन मॅडम, सिमरन डहाळे मॅडम सर्व शिक्षक, शिक्षिका व पालकवर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे श्री प्रतीक जैन यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती म्हणजे आपल्या मातृभूमीबद्दल असलेलं प्रेम, तिच्यासाठी काहीही करण्याची तयारी, आणि तिच्या सन्मानासाठी जगणं-मरणं, छत्रपती शिवाजी महाराज — ज्यांनी स्वराज्य स्थापण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. राणी लक्ष्मीबाई — ज्या लढल्या, पण परकीयांच्या गुलामगिरीत डोकं झुकवलं नाही. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव — ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हसत हसत फाशी स्वीकारली. सुभाषचंद्र बोस — ज्यांनी घोषणा दिली, “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा.” याला म्हणतात देशभक्ती. आज देशभक्ती फक्त रणांगणात नाही, तर प्रत्येक क्षेत्रात दिसते — सीमारेषेवर पहारा देणारे सैनिक, अतिरेक्यांशी लढणारे सैनिक, वैज्ञानिक ज्यांनी चांद्रयान-३ यशस्वी केलं. देशाच्या प्रगतीसाठी झटणारे वैज्ञानिक शेतकरी, जे दिवस-रात्र अन्न पिकवतात, जेणेकरून या देशातल्या प्रत्येकाची अन्नाची गरज भागते
असे असंख्य प्रेरणादायी अध्याय आहेत. ज्यांनी आपले आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केले, म्हणूनच आज आपण मुक्त आहोत. आज आपण तिरंग्यापुढे प्रतिज्ञा करू —
“मी प्रामाणिक नागरिक राहीन,
देशाच्या प्रगतीसाठी कार्य करीन,
आणि भारताचा मान जगभर वाढवीन, अशी प्रतिज्ञा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी घेतली.
स्वातंत्र्याची ध्वजा फडकते.
सूर्य तळपतो प्रगतीचा.
भारत भूमीच्या पराक्रमाला
मुजरा, मुजरा हा सर्वांचा.
असे मनोगत व्यक्त करीत सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *