ताज्या बातम्या

अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांची पोलीस ठाण्यातच आत्महत्या

नाशिक – पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या आपल्या दालनात गोळ्या मारून आत्महत्या केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्यात घडली आहे. सकाळच्या वेळेस झालेल्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावरती असलेले अशोक नजन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी कार्यरत होते . नजम हे नेहमीप्रमाणे मंगळवारी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि अंबड पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या कर्मचारी यांच्याशी चर्चा करून ते आपल्या दालनात गेले तिथे गेल्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या सर्विस रिवाल्वर मधून स्वतःच्या डोक्यावरती दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली .अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आल्यानंतर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी तातडीने त्यांच्या दालनाकडे धावले पण तोपर्यंत ते रक्ताच्या थोराळ्यात पडले होते. तातडीने वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.नजन हे सर्वसाधारण मागील सात आठ महिन्यापासून अंबड पोलीस ठाण्यामध्ये दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावरती कार्यरत होते. त्यांच्या स्वभाव अतिशय चांगला होता मनमिळ स्वभावा मुळे त्यांनी अंबड पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि या भागातील नागरिकांची मने देखील जिंकली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धती वरती अनेक जण खुश होते. आज त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने पोलिस दलात एकाच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *