ताज्या बातम्या

अखेर भूरटा चोर सापडला ! 4.5 किलो तांब्याची तार हस्तगत

धरणगाव : पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 87/24 कलम 461,379 व गुन्हा रजिस्टर नंबर 106/ 24 कलम 379 मध्ये धरणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे माननीय पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुणाल सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना धरणगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्यावरून संशयित आरोपी नामे प्रशांत जगन वार्डे वय 29 वर्ष राहणार गोरगावले तालुका चोपडा यास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 4.5 किलो तांब्याची तार हस्तगत केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यावर त्यावर चोपडा पोलीस स्टेशन तसेच अंमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असून सदरचा आरोप रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सदर आरोपींचा शोध घेण्या कामी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, चंदन पाटील, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वर्णमूद दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जिभाऊ पाटील साहेब तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *