ताज्या बातम्या

अजिंक्य लॉनजवळ भीषण अपघातात चहार्डीच्या १६ वर्षीय रुपेशचा मृत्यू ; २ जण जखमी

प्रतिनिधी-विनायक पाटील

चोपडा – शिरपूर रस्त्यावरील अजिंक्य लॉनजवळ भीषण अपघातात १६ वर्षीय बालकांचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पहाटे ७:०० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे चोपडयाहून जीम मध्ये सराव करून घराकडे परतत असतांना रुपेश तुळशीराम रायसिंग या विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातल्याने चहार्डी गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,चहार्डी येथील रहिवासी रुपेश तुळशीराम कोळी (वय 15 इयत्ता नववी), भावेश मोहन सोनवणे (इयत्ता नववी वय 15) आणि साहिल शकील पिंजारी (वय 19)हे तिघे मोटरसायकलीने (MH 19 AS 2290) चोपडा येथे जिम साठी पहाटे गेले होते. जिम करून घरी परत जात असतांना साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान जुना चोपडा शिरपूर रोडवरील अजिंक्य लॉन्स समोर एका ट्रक मागे मोटरसायकल चालत असतांना अचानक समोरून बस आली आणि अंदाज चुकल्याने हे बसच्या मागच्या चाका शेजारील पत्र्यावर मधोमध जोरात आदळले अन् दूर फेकले जाऊन अपघात झाला. सदर अपघाताबाबत अजिंक्य लॉन्स येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हायरल फुटेज पाहिल्यानंतर अपघात कसा घडला हे समजते आहे. या अपघातात साहिल शकील पिंजारी यासही गंभीर दुखापत झाल्याने व पाय फ्रॅक्चर असल्याने जळगाव येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आलेले आहे. तर भावेश मोहन सोनवणे याचाही अपघातात एक पाय फ्रॅक्चर झाल्याने तो चोपडा शहरातच उपचार घेत आहे. मयत” रुपेश” हा चहार्डी येथील उपसरपंच तुळशीराम धनराज कोळी यांचा मुलगा असून या दुर्घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली आहे. सकाळी अपघात झाला त्या ठिकाणी चहार्डी येथीलच प्राथमिक शिक्षक धनराज बडगे आणि चोपडा येथील पंकज विकास पाटील व डिगंबर पाटील हे रस्त्याने जात असताना त्यांना अपघात झाल्याचे कळल्यावर यांनी या जखमी अत्यावस्थ अवस्थेतील असलेल्या तिघांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाची ॲम्बुलन्स बोलवून तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. असता एकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात उप जिल्हा रुग्णालयाचे डॉ . प्रसाद पाटील यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यू क्र ८९/२३सीआरपीसी १७४ प्रमाणे अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास दीपक वसावे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *