अडावद आरोग्य केंद्रात सरपंच-ग्रामसेवक-जलसुरक्षक-आरोग्य कर्मचारी यांची संयुक्तिकरित्या कार्यशाळेचे आयोजन
प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या संकल्पनेतून घेतली कार्यशाळा
आज दिनांक-२२ जुन २०२४ शनिवार रोजी, कमळगावं आठवडा बाजारात पाणी पुरी मुळे विषबाधेच्या तथा साथरोगाच्या पार्श्वभूमीवर… बाधीत झालेली, कमळगाव,चांदसनी, पिंप्री,रुखनखेडा हि गावं तसेच सुटकार,वटार,वडगांव बु.,खेडीभोकारी या गावातील सरपंच, ग्रामसेवक,जलशुद्धीकरण करणारे जलसुरक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वर्ग यांची प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथे दुपारी २ वाजेला…अति तात्काळ एक सयुक्तिक रित्या कार्यशाळा आयोजित करण्यात आली.या कार्यशाळेसाठी सरपंच, जलसुरक्षक, गरमसेवक यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला.कार्यशाळेत उपस्थितांना, गावातील नागरिकांना अन्नातून विषबाधा झाल्यास, अथवा साथरोग लागण लागु नये म्हणून तथा लागल्यास, घाबरून न जाता आलेल्या परिस्थितीत काय उपाययोजना कराव्यात, उलट्या,जुलाबाचे रुग्ण आढळल्यास मनोधैर्य न खचु देता, त्वरित आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, उघड्यावरील अन्न पदार्थ, गावांतील फेरीवाले किंवा खाद्य पदार्थ विकणाऱ्या लोकांकडून खाद्य पदार्थ खाणे टाळावेत, रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये,शक्यतोवर.. ताजे आणि स्वच्छ अन्नपदार्थ हे खावेत, जेणे करून अन्नविषबाधा होणार नाही. गावामध्ये पावसाळ्यात शुध्द पाणी पुरवठा कसा केला जाईल या कडे जास्तीत जास्त भर लक्ष देण्यात यावे, पावसाळ्यात ग्रामपंचायत मध्ये तीन महिने पुरेल एवढा टी.सी.एल.पावडरचा पुरेसा साठा करून ठेवावा, व tcl ची बॅग वापर झाल्यावर तीनही पिशवीत घट्ट बांधून ठेवावी, ओलसर जागेत ठेवू नये, तो साठा कोरड्या, हवाबंद डब्यात भरून वापरावा, जेणेकरून tcl मधून क्लोरीन वायु हवेत उडून जाणार नाही,ज्या भागात नळ पाणीपुरवठा पोहचू शकत नसल्यास अथवा साथीच्या काळी TCL पावडरपासुन मदरसोलुशन बनवून ते घरोघरी जाऊन कसे वाटप करावे, या बाबत सविस्तरपणे आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख यांनी आरोग्यपूर्ण मार्गदर्शन केले.तसेच गावांत पाणी पुरवठा करणाऱ्या स्त्रोतांचे पाईपलाईन गळती, व्हॉल्व्हगळती त्वरित दुरुस्ती करणे, पाण्याची टाकी नियमित धुणे, नियमित क्लोरिनयुक्त शुध्द पाणीपुरवठा करणे, बाबत आरोग्य सहाय्यक-वाय.आर. पाटील यांनी सविस्तर पणे माहिती दिली.प्रसंगी… चांदसनी, वडगांव बु., पिंप्री, वटार, सुटकार, येथील सरपंच,सुटकार/वटार येथील ग्रामसेवक-जयवंत पाटील, तसेच-वडगाव बु.,चांदसनी, रुखनखेडा, पिंप्री, सुटकार, वटार,खेडीभोकरी, येथील पाणी पुरवठा करणारे जलसुरक्षक उपस्थित होते.अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी-डॉ. नितीन अहिरे, डॉ.अर्चना पाटील, डॉ.कोमल गवांडे, वर्डी येथील समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ.राहुल पाटील, वडगांव बु.चे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.भुषण देशमुख यांच्या सह.. आरोग्य सहाय्यीका-शोभा चौधरी, आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, यशवंत पाटील, औषधनिर्माण अधिकारी-विजया गावीत, आरोग्य सेवक-आर.एस.पाटील, संतोष भांडवलकर,कैलास बडगुजर, ओपीडी ANM-सि.के.बाविस्कर,निवेदिता शुक्ल, धुडकू वारडे, सचिन महाजन, मनोज चावरे आदी सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कार्यशाळेला सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक यांनी कार्यशाळेत उपस्थिती लाऊन दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देऊन..सर्वांनी कार्यशाळेला उपस्थिती दिल्याबद्दल, आरोग्य सहाय्यक- विजय देशमुख यांनी सर्वांचे मानले आभार.