अडावद येथे प्रार्थना स्थळाजवळील रस्त्यावरून दोन गटात भीषण दंगल : अनेक जण जखमी
चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा – तालुक्यातील अडावद येथे प्रार्थना स्थळा जवळील रस्त्याच्या वादावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दगड, विटांचा वापर करण्यात आला. त्यानंतर दोषींवर कारवाई करावी यासाठी एका गटाचा जमाव महिला पुरुषांसह शेकडोच्या संख्येने पोलीस स्टेशनला आला. शेवटी जमाव पांगविण्यासाठी पोलीस अधीक्षक कमांडो पथकासह गावात दाखलकमांडो पथकासह पोलीस अधीक्षक आल्यावर जमाव पांगवला
अट्रॉसीटीसह परस्पर विरोधी तक्रारीवरून ९३ जणांवर गुन्हा दाखल
जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यावर जमाव पांगविण्यात आला. आता गावात परिस्थिती नियंत्रणात आहे. सदर भागात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान यातील ८ ते १० जण जखमी झाले. त्यांचेवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्ह्यात ९३ आरोपितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यातील ४१ जणांवर अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, २१ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास अडावद पोलीस स्टेशनच्या समोरील प्रार्थना स्थळाजवळील मदरशाच्या बांधकामावरून दोन गटात वाद निर्माण होऊन त्यांचे रूपांतर दगड फेक करीत दोन्ही गटाच्या ग्रामस्थांनी एकमेकांवर दगड फेक केल्याने यात आठ ते दहा जण जखमी झालेत. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी रवानगी करण्यात आली.
दरम्यान दोषींवर कारवाई करावी यासाठी एका गटाचा जमाव महिला पुरुषांसह शेकडोच्या संख्येने पोलीस स्टेशनला आला. यावेळी अपूर्ण पोलिस कुमकीसह सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ यांनी जमाव थोपवून ठेवत. चोपडा शहर, ग्रामीण पोलीस स्टेशन, जळगांवहून महिला राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व स्पेशल कमांडो फोर्स दाखल झाल्यावर पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव डॉ. कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ याच्या पथकाने घटना घडलेल्या भागामध्ये जावून दंगेखोरांवर नियंत्रण मिळवले. रात्री दोन वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक अडावद पोलीस ठाण्यात ठान मांडून होते. तर पहाटे चार वाजेपर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव डॉ.कविता नेरकर या ठाण मांडून होत्या. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणून पहाटेपर्यंत दोन्ही कडील १४ आरोपिताना ताब्यात घेण्यात आले होते.
४१ जणांवर अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल
मदरशाचे बांधकाम करतांना तडवी वाडा भागात जाण्यासाठी वापराचा रस्ता सोडावा म्हणून मशिदीच्या संचालकांशी बोलणे सुरू असताना त्याचे रूपांतर वादात झाले. नंतर दगडफेक करण्यात आली तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात येवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली म्हणून अडावद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९, ११०, १८९(२), १९१(२), १९०,३५२, ३५१(२) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ चा ३(२), ३(व्ही), ३(१)(आर), ३(१)(एस.) नुसार संशयीत आरोपी जहांगीरखां गफ्फारखां पठाण, रियाज शेख कबिरोद्दीन शेख, रियाजअली अजगरअली सैय्यद, शेख एजाज शेख अब्दुल रैउफ, बिलाल शेख हा एजाज शेखचा भाचा, बबलु मोईद्दीन, नाशीर खां खलील खाँ, वईद नाशीर खान , जुबेर नाशीर खान, पप्पु नाशीर खान, नसैरुल अब्दुल रैउफ, साजीत असलम खान, मोहसीन जबीउल्ला खाँ, अजिम अमिर खान, मोईनोद्दीन जबीउल्ला खान, रहेबर अली सैय्यद अली, बाबु सैय्यद अली, इम्रान खान माजित खान, रईश खलील टेलर, खलील शहा मंडपवाले, अजहर जहीर, अशपाक खलील, आशीक अजगर पठाण, अबरार युनुस पठाण, शाहरुख युनुस पठाण, जाकीर जहीर, आजिम अमीर, तैसिक रियाज, अरशद खान इस्माईल खान, जावेद खान अमीन खान, शेख रईस शेख रसीद, शेख अजहर शेख मोयद्दीन, मिसबाह एजाज शेख, अजरुल अब्दुल गफूर, कासिम महेमुद, जुबेर बाबु पठाण, फैजल खान इबादुल्ला, मोसिम खान ईस्माइल खान, तन्वीर खान युसुफ खान, खलील शहा जकीर शहा, तैसिफ अजगर अली सैय्यद, सर्व रा. अडावद अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपवभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, चोपडा हे करीत आहेत.
तर दुसऱ्या तक्रारीत तुम्ही मदरसा कसा बांधतात हा आमचा वापराचा रस्ता आहे. असे सांगत तडवी वाड्यातून जमाव चालून आला व त्यांनी दगडफेक करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून मोहसीन खान जबिउल्ला खान (३९) रा. अडावद यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी रमजान छबु तडवी, पप्पु छबु तडवी, गोलु छबु तडवी, सबाना छबु तडवी, साबीरा छबु तडवी, सुलेमान बहादुर तडवी, तनुजा लाला तडवी, अमन लाला तडवी, शरीफ नादर तडवी, महेरबान रज्जाक तडवी, रुबाब नादर तडवी, फिरोज जुम्मा तडवी, पिरखॉ ईमामा हसन, राजु ईमाम तडवी, आसीफ ईमाम तडवी, शकील सुभान तडवी, फिरोज ईतबार तडवी, अकबर नामदार तडवी, गोलु फत्तु तडवी, जहाँगीर सत्तार तडवी, शरीफ सत्तार तडवी, अफरोज सलिम तडवी, अलताफ रज्जाक तडवी, अखतर गुलशेर तडवी, अलताफ लायक तडवी, गुड्या सत्तार तडवी, आसीफ सत्तार तडवी, मुस्ताकीम सुभान तडवी, मोहम्मद शाहा सुभान शाहा, अलीयार रमजान तडवी, मोहसीन अलीयार तडवी, अलताफ अलीयार तडवी, आझाद नबाब तडवी, जाकीर कलिंदर तडवी, मुस्ताफा फकिरा तडवी, जरीना गुलाब तडवी, मिना रहेमान तडवी, आबेदा गुलाब तडवी, सायरा जहाँगीर तडवी, ईरशाद लालखॉ तडवी, जुबेदा बादल तडवी, शाहरुख हैदर तडवी, शबनम अलताफ तडवी, अलीशान रज्जाक तडवी, सबनुर शरीफ तडवी, अलताफ कालु तडवी, नबाब ईतबार तडवी, कालु सिंकदर तडवी, चिंगा फकिरा तडवी, ईस्माईल मरदान तडवी, छायाबाई मोहसीन तडवी, सर्व रा. अडावद यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम १०९, ११०, १८९ (२), १९१ (२), १९०,३५२,३५१(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक प्रमोद वाघ हे करीत आहेत.