अनिलराज यांच्या चित्राची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात निवड

चोपडा प्रतिनिधि / विनायक पाटील
जळगांव : महाराष्ट्र राज्य व गोवा राज्यामध्ये किशोरी थिएटर, चित्रकार प्रोडक्शन व दिपाली इंटरप्राईजेस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर धर्म रक्षक गोमाता रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर छत्रपती शंभू महाराजांचे शौर्य व जीवन चरित्र यावर आधारित भव्य स्वरूपात चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन घेण्यात येत आहे. सदर स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर असून महाराष्ट्रातील नामवंत व गोव्या राज्यातील चित्रकार यांचा समावेश या स्पर्धेत आहे. जळगाव खानदेशातील चोपड्याचे चित्रकार अनिल राज पुनमचंद पाटील यांची या स्पर्धेत जळगाव
जिल्ह्यातील चित्रकार म्हणून निवड करण्यात आलेली आहे. अनिल राज यांच्या चित्रांमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी रक्षण केले होते. गोमाता हत्या बंदी व धर्म रक्षणासाठी तेव्हा तेव्हा हातामध्ये शस्त्र घ्यावे लागते असे दाखविले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, शेतीसाठी लागणारे हत्यार ‘नांगर’ सुद्धा या चित्रात दाखविला आहे. अनिल राज यांनी काळी शाई पेन ने स्टिपलिंग पद्धतीमध्ये चित्र रंगवलेले आहे. सध्या सर्वीकडे छावा हे नाव ऐकू येत आहे. यावर आधारित ही स्पर्धा असून, हे चित्र या चित्र प्रदर्शना मध्ये विशेष चित्र म्हणून लावण्यात येणार असल्याचे किशोरी थीएटरचे अध्यक्ष किशोर मिस्त्री व चित्रकार प्रॉडक्ट्शन चे अध्यक्ष हेमंत वाणकर यांनी अभिनंदन करून सांगितले आहे. अनिलराज या आधी देखील अंतर राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारानी सन्मानित आहेत. नुकतेच त्यांना दिल्लीच्या नेत्रांजली डान्स अकॅडमी चा 26 जानेवारी निमित्त घेण्यात आलेल्या भारतीय जवाण या चित्राला 2 पुरस्कार मिळाला आहे. अनिलराज यांचे मित्रपरिवार, गुरुजन यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.