अबब…! तावसे बुद्रुक येथील सलून दुकानातून लाखो रुपयांची चोरी ; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी-विनायक पाटील
चोपडा – आज दिनांक ०३/१०/२०२३ रोजी बळीराम विठठल नेरपगार वय ७१ धंदा न्हावीकाम रा.तावसे बु ता.चोपडा यांनी चोपड़ा ग्रामीण पो.स्टे ला येवुन फिर्याद दिली की,दि.२३/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०५.३० वा.मी तसेच माझी पत्नी सकुबाई असे पुणे येथे माझा मुलगा प्रमोद बळिराम नेरपगार यास भेटण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर दि.०३/१०/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वा. आम्ही पुणे येथून घरी तावसे बु// गावी आलो तेव्हा घराचे दरवाज्याला कुलुप लावलेले होते. तेव्हा माझा मुलगा राहुल नेरपगार याने मला घराच्या दरवाज्याची चाबी दिली तेव्हा मी घराचा दरवाजा उघडुन पाहिले असता माझे घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच घरातील सोन्या चांदीचे दागीने ठेवलेला पत्री डब्या जमिनीवर उघडया स्थितीत पडलेला दिसला तेव्हा मी सदरचा डबा उचलुन पाहिले असता त्यात आम्ही ठेवलेले सोन्या चांदीने दागीने दिसले नाही. त्यावरुन माझी खात्री झाले की, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बंद घरास असलेल्या प्लास्टीक बाजुला सारुन व दुकानाचे मागील भिंतीस असलेले खिडकी तोडून आत प्रवेश करुन दुकानात ठेवलेली जर्मनची पेटी चे कुलूप उघडुन त्यात असलेले रोक रक्कम १३००००/- रु व घरात प्रवेश करुन घरातील ७,५००/- रुच्या दिड ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील बाहया व ४२००/- रु.च्या ७ भाराचे हातातील चांदीचे कडे असे एकुण १,४१,७००/- रु. त्यात रोख रुपये व सोन्या चांदीचे दागीने व रक्कम चोरुन नेले आहे अशी फिर्याद दिल्यावरुन चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला गुरनं.१७६/२०२३ भादवी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर स्वतः करीत आहे.