अबब…! वढोदा येथील शेतकऱ्याची ट्रक ड्रायव्हर कडून लाखो रुपयाची फसवणूक
प्रतिनिधी- चोपडा तालुका/ विनायक पाटील
चोपडा प्रतिनिधी…दि.१४/०९/२०२३ रोजी रविंद्रकुमार रामदयाल शर्मा (वय ३७) धंदा ट्रान्सपोर्ट चालक (मुळ रा. आगोंन १०४ मेवात (हरीयाणा) ह. मु. गोरगावले रोड, वृदांवन कालनी, चोपडा) यांनी चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला फिर्याद दिली की, त्यांच्या ट्रान्सपोर्टवरुन व्यापारी अब्दुल सऊद शेख मेहमुद बागवान रा. चोपडा यांनी वढोदा येथून केळी भरुन ती झज्जर ता.जि.झज्जर राज्य हरियाणा येथिल मे. रॉयल फ्रुट कंपनी यांच्या कडेस घेवुन जाण्यासाठी फिर्यादीचे ट्रान्सपोर्टवरुन दि.०७/०९/२०२३ रोजी आयशर गाडी क्र RJ 02 GC 2303 हि ठरवली होती. सदर गाडीवर ड्रायव्हर मुस्तफा आस मोहम्मद (रा परवाडा ता रामगड जि अलवर ,राज्य राजस्थान) हा होता. त्याने त्याचे ताब्यातील गाडीमध्ये वढोदा येथिल शेतकरी यांचे १३ टन ६२० किलो वजनाची केळी २,५४,७७५/- रु. किं.ची हि निघाला असता तो दि.१०/०९/२०२३ रोजी झज्जर येथे पोहोचणे आवश्यक होते, परंतु सदर ड्रायव्हर हा आज पावेतो झज्जर येथे न पोहचल्याने सदर गाडी ड्रायव्हर याने त्याचे गाडीमध्ये भरलेली केळी कोठेतरी विल्हेवाट लावुन फिर्यादीची फसवणुक केली असल्याने आज रोजी चोपडा ग्रामीण पो.स्टे.सी.सी.टि.एन.एस. गुरनं ०१६९/२०२३ भादवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोहेकॉ/२१४० राजु महाजन, पोहेकॉ/२५३ भरत नाईक हे करित आहेत.