अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा ; नवी दिल्ली येथे झालेल्या वेट लिफ्टिंग स्पर्धेत दिव्यांग खेळाडू दिनेश बागडे याने पटकाविले सुवर्णपदक

अमळनेर प्रतिनिधि / संतोष पाटील
खेलो इंडियाच्या पॅरा गेम स्पर्धेत वेट लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेर येथील दिव्यांग खेळाडू दिनेश बागडे याने सुवर्णपदक पटकावत अमळनेर च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
नवी दिल्ली येथे २० मार्च ते २७ मार्च दरम्यान खेलो इंडियाच्या पॅरा गेम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. एकूण १३०० विविध प्रकारचे खेळाचे खेळाडू यात सहभागी झाले होते. यातील १०७ किलो वजनाच्या वेट लिफ्टिंग स्पर्धेतील अंतिम फेरीत सात स्पर्धक होते. दिनेशने यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. दिनेशने गेल्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. सुवर्ण पदक मिळवण्याचे स्वप्न त्याने प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पूर्ण केले आहे. दिनेशच्या विजयाने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण अमळनेर शहर उत्साहात आहे. दिनेश बागड निराश झालेल्या तरुणाईचा आज आयकॉन आहे.
मसल्स फॅक्टरी जिम चा तो अभिमान असून त्याचे कोच प्रशिक्षक किशोर महाजन यांनी दिनेश बद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. व्यसनाकडे जाणाऱ्या तरुणाई ने दिनेश बागड चा आदर्श ठेवा. मसल्स फॅक्टरी जिम तुमच्या आरोग्य फिटनेस साठी सदैव तत्पर आहे. असे मत किशोर महाजन यांनी दिनेश बद्दल अभिमानाने व्यक्त केले. अभ्यास सोबत आरोग्याची काळजी पण घेतली पाहिजे. आजच्या धावपळीच्या काळात आरोग्य सांभाळेल तो सर्वात श्रीमंत. अशी प्रतिक्रिया योगेश राजपूत यांनी व्यक्त केली. दिनेश बागड सारख्या होतकरू उम्मेदी मुलांना आधार देणे हीच मसल्स फॅक्टरी जिमचे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.