अर्धापूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी

अर्धापूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एका महिन्यात 6 अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमीअर्धापूरात दररोज किरकोळ एक ते दोन अपघात होतात अपघात रोखण्यासाठी मुख्य रस्त्याला जोडणा-या रस्त्यावर व राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवा – मागणी अर्धापूर दि.18 (ता.प्र.) अर्धापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर मागील एका महिन्यांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.एका महिन्यात 6 अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत.अर्धापूर तालुक्यातील रस्त्यावर दररोज किरकोळ एक ते दोन अपघात होतात.किरकोळ अपघाताची कोणी नोंद पण करीत नाहीत.या अपघातातून सुखरूप वाचलो म्हणून देवाचे आभार मानून दवाखान्यात किंवा घरी निघून जातात.अर्धापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी मुख्य रस्त्याला जोडणा-या रस्त्यावर व राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवा.या मागणीचे निवेदन पत्रकार संघाच्या वतिने जिल्हाधिकारी नांदेड यांना तहसीलदार, अर्धापूर मार्फत मंगळवारी (ता.१८) निवेदन देण्यात आले.अर्धापूर तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्हा प्रमुख मार्ग गेले आहेत.या महामार्गावरून जड वाहने, प्रवासी वाहतूक, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठी आहे.दररोज वाहतुकीची वर्दळ जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे.हा एक चिंतेचा विषय झाला आहे. मागणी एका महिन्यात 6 अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत.अर्धापूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना कमी करण्यासाठी 1. वेग मर्यादा फलक व सुचना फलक लावने, 2. गावातून मुख्य रस्त्याला जोडणा-या रस्त्यावर गतिरोधक बसविणे, 3. राष्ट्रीय महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविणे, 4. विरूध्द दिशेने येणाऱ्या वाहतूकीला आळा घालने, 5. महामार्गावरील धाबे, हाॅटेल, पेट्रोल पंप चालकांनी वाहने थांबविण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे, 6. अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी अर्धापूर येथे ट्रोमा सेंटर उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविणे, 7. वाहतूकीचे नियम, वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी, वाहनांची तपासणी आदी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशीत करण्यात यावे.या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिने जिल्हाधिकारी नांदेड यांना तहसीलदार रेणूकादास देवणीकर, अर्धापूर मार्फत देण्यात आले.या निवेदनावर नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत विरकर यांच्या स्वाक्षरी आहेत.