ताज्या बातम्या

अवधेश बाजपेयी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

धरणगांव प्रतिनिधि / विनोद रोकडे

धरणगांव – येथील सुनिल चौधरी यांच्यावतीने चौधरी समाजाने पोलीस निरीक्षक पवन देसले यांची भेट घेत अवधेश बाजपेयी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. सदर निवेदनाची दखल घेत सुनिल चौधरी यांची फिर्याद पोलीस स्थानकात घेण्यात आली. त्यानुसार सुनिल चौधरी यांनी फिर्याद दिली असता अवधेश बाजपेयी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 352, 351 (2) (3) नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार अवधेश बाजपेयी यांनी 10 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास उसनवार दिलेले पैसे परत मागण्यासाठी सुनिल चौधरी हे गेले असता, अवधेश बाजपेयी यांनी, “माझ्याकडे कोणतेही पैसे राहिलेले नाही. मी आता पुन्हा पैसे देणार नाही. माझ्याकडे दोन बंदूक आहेत. माझ्या नादाला लागलास तर मी तुला खल्लास करून टाकेल. तुझ्यावर पोलिसात तक्रार देईन. तुझी सुपारी देईन असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *