अवैध दारू विक्री ला बंदी घालण्यासाठी वाघोड येथे ग्रामसभेत प्रचंड गोंधळ

रावेर (प्रतिनिधी) कमलेश पाटील
रावेर – तालुक्यातील वाघोड येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत गावातील अवैध दारू विक्रेत्यांना विरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणी साठी ग्रामस्थांनी प्रचंड गोंधळ उडावला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजय मशाने यांच्या परवानगीने सभा सुरू करण्यात आली तदनंतर ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी अनिल पाटील यांनी सभेच्या ठिकाणी विषय वाचून दाखवले आयत्यावेळी वेळी विषयावर चर्चा करतांना गावातील देशी दारू चे दुकान बंद असतांना देखील तसेच मागे दारू विक्रेत्यांविरोधात महिला अक्रमक होऊन टपऱ्या जाळपोळ करण्यात आली होती तरी गावात काही ठिकाणी अवैध दारू कशी विकली जातेय. त्यावर ग्राम पंचायत लक्ष का देत नाही,चार वर्षे होऊन पण आतापर्यंत ग्राम पंचायत कार्यालय ने दारूबंदी कमेटी का स्थापन केली नाही, सर्व पंचायत सदस्य ग्राम सभेला उपस्थित का राहत नाही अशा अनेक प्रश्नांवर भडीमार करत ग्रामस्थांनी ग्राम सभा गाजवली.
तदनंतर स्थानिक पोलिस पाटील कुशल महाजन यांनी अवैध दारू विक्रेत्यांनाची नावं द्या आपण त्यांना समज देवू तरी पण त्यांनी एकलं नाही तर पोलीस स्टेशन ला नावं कळवून कार्यवाही करण्यास भाग पाडू असं आश्वासन दिले तेव्हा ग्रामस्थचे समाधान झाले.