ताज्या बातम्या

अवैध व्यवसायकांची गैर करणार नाही : ठाणेदार राहुल आठवले यांचे प्रतिपादन

यवतमाळ प्रतिनिधी निलेश वंजारी नियर जिल्हा यवतमाळ

दुर्गा उत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. यामुळे ग्रामीण भागातील गावठी दारू, मटका जुगार ,अवैध व्यवसायावर पायबंध घालावा व शांतता प्रस्थापित करावे असे आवाहन ठाणेदार राहुल आठवले यांनी मोझर येथील झालेल्या जनजागृती कार्यक्रमामध्ये केले. यावेळी मंचावर रा.का.चे तालुका अध्यक्ष सुनील खाडे, संगीता ढवळे ,केशव मोहरकर, दत्तोपंत थोटांगे ,विश्वनाथ जमदाडे, जमादार सचिन डाहाके उपस्थित होते.
ग्रामीण भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्याकरिता व जातीय सलोखा व कोणाच्याही भावना दुखावू नये याची दखल प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात अवैध व्यवसायला लगाम लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मद्यप्राशन करून वाहने चालवणे व कोणतेही अवैध व्यवसाय आढळल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.असे आवाहन या जनजागृती कार्यक्रमामध्ये ठाणेदार राहुल आठवले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तंटामुक्ती अध्यक्ष राहुल काळे तर आभार विनोद भैसे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता धनराज निकुरे,भुपेंद्र निकुरे, ,राम साखरकर ,पवन साखरवाडे, रवींद्र निकम,गुलाब देशमुख राम साखरकर श्याम खांदेल पिंटू निकम विजय राणे इत्यादींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *