महाराष्ट्र

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुक प्रभारीपदी भाऊसाहेब पगारे यांची निवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या

प्रतिनिधी : आशिष संसारे


राहुरी / देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांची अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक प्रभारी पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली असून याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपापली तयारी करत असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाने देखील पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रभारी पदांची यादी जाहीर केली आहे. त्याच पद्धतीने अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी भाऊसाहेब पगारे यांच्यावर देण्यात आली आहे.
पगारे यांनी दक्षिण व उत्तर अहमदनगर जिल्ह्यात गावोगावी शाखा उभारून कार्यकर्त्यांचे संघटन केले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय सेक्रेटरी मोहनलाल पाटील यांनी ही निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *