आंबेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
आंबेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थींना आवश्यक शालेय साहित्य वाटप कार्यक्रमास सभापती मंचकराव पाटील साहेब यांनी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्याचे अभिनंदन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी आपले धेय्य निश्चित करून पुढं वाटचाल करावी. अपयश आल्यावर विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपली ठरलेल्या धेय्याप्रमाणे वाटचाल करून सातत्य आणि चिकाटी ठेवल्यास यास निश्चितच प्राप्त होते. असे मत यावेळी व्यक्त केले.शालेय साहित्य वाटप करून वृक्षारोपण केले.वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत त्या मुळे पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपण वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे.असे यावेळी व्यक्त केले. यावेळी माजी जि.प.सदस्य माधवराव जाधव,सैदापुरे सर, बाळासाहेब पाटील, सरपंच सत्यभामा पाटील सरपंच यास्मिन पठाण,द.मा.माने सर, भगवान पाटील, शिवाजीराव पाटील शिवराज सुर्यवंशी, बाळासाहेब सुर्यवंशी,आयुब पठाण,माधव माने,भारत सुर्यवंशी गुलाब पठाण, विठ्ठल कदम,शशांक कांबळे,गनि शेख सलिम पठाण, एकनाथ कदम, मनोहर माने, मनिषा ताई कानवटे,ग्रामसेवक गित्ते मॅडम, मुख्याध्यापक कचवे सर,शेख सर,पालक,विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.