ताज्या बातम्या

आदिवासी खेळाडूंनी गाजवले मैदान ; बीट स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील

एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत बीट स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्रकल्पाचे अधिकारी अरुणजी पवार यांच्या मार्गदर्शनाने ०२ऑक्टोबर रोजी चोपडा येथील कला,शास्त्र, वाणिज्य महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आल्या होत्या.स्पर्धेचे उद्घाटन यावल प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील आणि संदीप पाटील,चोपडा बीटच्या कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम.आर सुलताने यांच्या हस्ते करण्यात आले.१०० मीटर ते ५००० मीटर धावणे,लांब उडी,उंच उडी,गोळा फेक,भाला फेक,रीले आदी क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश होता.१४,१७,१९ या वयोगटातील मुला-मुलींनी आपले कसब दाखवले.अनुदानित आश्रमशाळा कर्जाणे येथील धावपटूंनी नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व राखत स्पर्धेतील आपले वेगळेपण सिद्ध केले.पावसाने उघडीप दिल्याने क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेदरम्यान विविध समित्यांनी आपले काम पार पाडले.यावेळी खेळाडू,क्रीडा समन्वयक, क्रीडाशिक्षक,पंच,मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *