ताज्या बातम्या

आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने चोपडा विधानसभा मतदार संघासाठी १२३ कोंटींचा भरगच्च निधी मंजूर

प्रतिनिधी – विनायक पाटील, चोपडा

जळगांव – नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या प्रयत्नाने १२३.५८कोटींचा भरगच्च निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण , आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांचे आमदारद्वयींनी आभार मानले आहेत. चोपडा तालुक्यात आदिवासी विकास विभागांतर्गत रस्ते व पुल विकसीत करणेसाठी ५० कोटी, वैजापूर येथे मुलींचे वसतिगृह इमारत बाधणेसाठी १४.७९. कोटी , वाघझिरा येथे आश्रमशाळा इमारत बांधणे – किंमत १४.९१ कोटी असे एकुण ७९.६१ कोटी मंजुर करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते व पुल विकसित करण्यासाठी ४३.९७ कोटी असे एकूण १२३ .५८ कोटी रुपयांची कामे मंजूर झाले आहेत. चोपडा मतदार संघातील अर्थसंकल्पीय कामे २०२३-२४ (डिसेंबर-२०२३) मधील मंजूर कामात १) सत्रासेन – उमर्टी – वैजापूर – देवझिरी रुंदीकरणासह सुधारणा करणे २),गरताड गावात गटारीसह रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी ३) लासूर व वेळोदे ता. चोपडा गावात गटारीसह रस्ता काँक्रीटीकरण करणे , ४)चहार्डी ता. चोपडा गावात गटारीसह रस्ता काँक्रीटीकरण करणे,५)धनवाडी ते कोळंबा रस्त्याची सुधारणा करणे, ६)धानोरा ते बिडगांव रस्त्याची सुधारणा करणे, ७)वडगाव बु. ते कमळगांव रस्त्याची सुधारणा करणे,८) पुनगांव ते कोळन्हावी रस्त्याची सुधारणा करणे,९)वडगांव बु. गावात गटारीसह रस्ता काँक्रीटीकरण करणे, १०)विटनेर ते घाडवेल रस्त्याची सुधारणा करणे, ११)हातेड खु. ते घोडगाव रस्त्याची सुधारणा करणे,१२)गणपुर- मराठे ते लासुर रस्त्याची सुधारणा करणे,१३)बिडगांव ते मोहरद रस्त्याची सुधारणा करणे,१४)अडावद – रुखनखेडा – चांदसनी रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे,१५) चोपडा ते वराड रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे, १६)धनवाडी ते गोरगावले रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे,१७)नागलवाडी ते आडगाव रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे,१८) वेळोदे ते गलवाडे रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे, १९)गलंगी ते धानोरा तांडा रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे,२०)गरताड ते तावसे रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे,२१) आडगाव ता. यावल गावाजवळ लहान पुलांचे बांधकाम करणे ,२२) किनगाव ते इचखेडा फाटा ता. यावल रस्ता दुरुस्ती करणे, २३)शिरागड ते थोरगव्हान रस्ता सुधारणा करणे , २४)वाघझीरा गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे, २५)हरीपूरा गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे, २६)मालोद ते इचखेडा( रामा 42 जंक्शन ते प्रजिमा 11) ची सुधारणा करणे, २७)नायगाव ते गायरान रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे,२८)सावखेडा ते निंबादेवी धरण रस्त्याची सुधारणा करणे,२९) गायरान गावाजवळ लहान पुलांचे बांधकाम करणे ता. यावल, जि. जळगाव ३०)जामुनझीरा ते हरिपुरा रस्त्याची सुधारणा करणे, ३१)जामुनझीरा – नागादेवी – सावखेडा फाटा रस्त्याची सुधारणा करणे ,३२) नागादेवी धरणाजवळ गावाजवळ वर लहान पुलांचे बांधकाम करणे, ३३)हरीपुरा ते मोहराळा रस्त्याची सुधारणा करणे, ३४)गायरान ते निंबादेवी धरण रस्त्याची सुधारणा करणे,३५)उमर्टी ते कृष्णापूर रस्त्याची सुधारणा करणे,३६)मोहारद ते चांदण्यातलाव रस्त्याची सुधारणा करणे, ३७)कुंड्यापाणी ते शेवरीपाडा रस्त्याची सुधारणा करणे, ३८)घुपामायपाडा ते खर्डी रस्त्याची सुधारणा करणे, ३९)देव्हारी ते जुने गावठाण रस्त्याची सुधारणा करणे, ४०)मोहारद ते धानोरा रस्त्याची सुधारणा करणे, ४१)मालापूर ते गुळप्रकल्प रस्त्याची सुधारणा करणे, ४२)उमर्टी ते सत्रासेन रस्त्याची सुधारणा करणे. या कामांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *