आयपीएस अधिकारी निकेतन कदम यांच्याकडून मिशी येथील शाळेला संगणक भेट
आदिनाथ ठाकूर देवळा प्रतिनिधी नाशिक
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संगणकाचा आधार घेऊन विविध अभ्यासक्रम पूर्ण करून शहरी विद्यार्थ्यांची बरोबरी करून शैक्षणिक क्षेत्रात पुढे जावे असे आव्हान आयपीएस अधिकारी निकेतन कदम यांनी मिशी येथे संगणक कक्षाचे उद्घाटन करताना भ्रमण ध्वनी द्वारे केले,. शालेय शिक्षण विभाग ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर इनिशिएटिव्ह लीडरशिप फोर इक्विटी यांच्या माध्यमातून व व आयपीएस निकेतन कदम यांच्या विशेष प्रयत्नातून जनता विद्यालय मिशी येथे आठ आठ संगणक देण्यात आले. श्री बन्सीलाल कदम, सौ सौ कल्पना कदम व इंजिनीयर श्री मिलिंद कदम यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे राजू शिरसाठ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुनंदा अहिरे शिवाजी अहिरे पंचायत समिती सभापती केदा शिरसाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शाहू शिरसाठ भिला आहेर राकेश आहेर भिका बोरसे माजी सैनिक प्रवीण बोरसे विश्वास जाधव पत्रकार वैभव पवार जगदीश निकम आदिनाथ ठाकूर आदींसह मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मिलिंद कदम प्राचार्य भिका बोरसे शिवाजी अहिरे प्राचार्य गोरख निकम कुमारी श्रुतिका पगार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन सर यांनी तर आभार हर्षल जाधव यांनी मांडले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.