ताज्या बातम्या

आर डी पाटील ICONIC MENTOR IN COACHING AWARD पुरस्काराने सन्मानित

चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा येथील पंकज विद्यालयाचे उपशिक्षक आर डी पाटील यांना ICONIC MENTOR IN COACHING AWARD 2024 हा पुरस्कार ATMIA GLOBAL EDUCATION SERVICE MUMBAI व विद्या प्रबोधिनी जळगाव तर्फे प्रदान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रम व सेवांसाठी त्यांचा गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार जळगाव येथील आमदार राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत डॉ चिराग वाघेला ( संचालक – आत्मिया एज्युकेशन, मुंबई ) , रोहीत गोकाणी ( संचालक – आत्मिया ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस, मुंबई – नाशिक – जळगाव ) , योगेश पाटील ( संचालक – विद्या प्रबोधिनी, जळगाव ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सदर कार्यक्रम रिगल थिएटर , नेहरू चौक, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या या यशाबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, सचिव अशोक माधव कोल्हे, संचालक नारायण बोरोले,संचालक गोकुळ भोळे यांच्यासह मुख्याध्यापक एम व्ही पाटील ( प्राथमिक ) , मुख्याध्यापक व्ही आर पाटील ( माध्यमिक ) , प्राचार्य डॉ आर आर अत्तरदे, प्राचार्य मिलिंद पाटील, प्राचार्य केतन माळी, बालविभाग प्रमुख सौ रेखा पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नातेवाईक व मित्र परिवार कडून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *