आ.राजेश पाडवी यांच्या प्रयत्नाने मतदार संघाच्या विकासासाठी ११९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

नंदुरबार(राहुल शिवदे)
शहादा, तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पातून मतदार संघातील विकास कामांसाठी ११९ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले आहे.
शहादा, तळोदा मतदार संघ दोन तालुक्यात विभागाला गेला असून या दोन्ही तालुक्यासाठी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे ११९ कोटी रुपयांचा निधी विविध विभागाअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.या निधीतून मतदार संघात विविध रस्ते, पूल संरक्षण भिंत इत्यादी सर्व विविध कामे करण्यात येणार आहेत शहादा तळोदा मतदार संघात आमदार राजेश पाडवी यांनी आतापर्यंतच्या आपल्या कार्यकाळात मतदारांशी व कार्यकर्त्यांची सातत्याने संपर्क ठेवला आहे. असंख्य विकासाची काम केलेले आहेत काही कामे प्रगतीपथावर आहेत मतदारसंघातील विकास कामांसाठी वाढीव निधी मिळावा म्हणून हिवाळी अधिवेशनात त्यांनी सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा करून मागणी निधी बाबत मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत ११९ कोटी रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे
शहादा, तळोदा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पातील भरीव निधी उपयोगी ठरेल येणाऱ्या काळात मतदारसंघातील एकही रस्ता सुटणार नाही असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले आहे.
आ.राजेश पाडवी यांच्याकडून ११९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये आदिवासी विकास विभागासाठी ५६ कोटी ७५ लाख.तर सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ५८ कोटी ५० लाख व नाबार्ड साठी ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे.