महाराष्ट्र

इंस्टाग्राम वर ‘महामानवांच्या’ बाबतीत आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

लोकनायक न्युज करिता प्रतिनिधी, आशिष वानखडे, अकोला

अकोला – तेल्हारा तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत असलेले ग्राम आडसूळ येथील युवक नामे रोहित सदिंप चिकटे, वय 18_वर्ष या युवकाने १९ जुलै रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी ईस्टाॅग्राम वर चुकीची पोस्ट टाकल्याने अख्या तेल्हारा-तालुक्यात जातिभेद निर्माण केला आहे. याबाबतीत ‘महामानवांच्या’ बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी सदर युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवकाने धार्मीक भावना दुखवतील अशा प्रकारे मोबाइल वर आक्षेपार्ह कमेंट पाठवून बौद्ध धर्माच्या समाजाचे भावना दुखविल्या प्रकरणी काल रात्री दिनांक २४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 295_अ अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस सहाय्यक बीट जमादार पी.एस.जांभळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *