उखळी खुर्दच्या मयुरी नागरगोजे या बालिकेची विज्ञानवारीसाठी निवड

परभणी – राष्ट्रीय विज्ञान दिवस आयुका पुणे येथे साजरा करण्यासाठी जी.प.प्रा.शाळा उखळी(खुर्द) येथील विध्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे. परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे दि. 17-02-2025 रोजी घेण्यात आलेल्या विज्ञानवारी 2025 परीक्षेमध्ये मध्ये जि.प.प्रा.शा. उखळी (खुर्द) ता.गंगाखेड येथील विध्यार्थिनी कु. मयुरी अर्जुन नागरगोजे, वर्ग 7 वी. ही तालुका स्तरावरून द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावरून ‘आयुका पुणे’ येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यासाठी जिल्हास्तरावरून निवड करण्यात आली आहे. आयुका पुणे येथे जाण्यासाठी विज्ञान व संशोधन या विषयावर जिल्हा स्तरावरून परीक्षा घेऊन जिल्ह्यातील 50 गुणवंत विध्यार्थ्यांची निवड केलेली आहे. त्यापैकी मयुरी अर्जुन नागरगोजे ही उखळी (खुर्द) या गावातून निवड झाल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्व ग्रामस्थ मंडळी उखळी (खुर्द) तसेच शाळा व्यवस्थापन समिती उखळी (खुर्द) यांनी शाळेतील मुख्याध्यापक मुंढे बी एम, शिक्षक मुळे व्ही. एस., कांबळे आर. पी., सिरसाट पी. एन., लटपटे गवळण आदींचे गावकऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.