ताज्या बातम्या

उद्यापासुन मुंबईच्या आझाद मैदानावर कोळी जमातीचे ठिय्या आंदोलन

कोळी जमातीच्या घटनात्मक अधिकारांसाठीचा लढा सुरूच ठेवणार

चोपडा प्रतिनिधी – विनायक पाटील

आदिवासी कोळी जमातीच्या घटनात्मक अधिकारांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर दि.२९ फेब्रुवारी २०२४ पासुन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कारण राज्यातील सर्वच उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयांकडे आदिवासी कोळी जमातीचे जात प्रमाणपत्रांसाठीचे प्रस्ताव प्रदीर्घकाळ प्रलंबित असणे कायद्याला धरून नाही. घटनेने दिलेल्या अधिकारांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र हे साधन असतांना कोळी जमातीला घटनादत्त अधिकार मिळवण्यासाठी सातत्याने आंदोलने, उपोषणे करावी लागत आहेत. हे शासन प्रशासनाला अशोभनीय आहे. अनुसूचित जमातीचे टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे जातप्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे, ही आमची मागणी रास्त व संविधानिक आहे. कारण आमच्याकडे सर्व प्रकारचे सबळ पुरावे असूनही संबंधित विभाग आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवत आहे. म्हणूनच आम्ही यापुढील काळातही आदिवासी कोळी जमातीच्या घटनात्मक अधिकारांसाठीचा लढा सुरूच ठेवणार आहोत, अशी स्पष्टोक्ती राज्यस्तरीय महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर (चोपडा), निमंत्रक ऍडव्होकेट शरदचंद्र जाधव (पुणे), आयोजक सखाराम बिऱ्हाडे (छ.संभाजीनगर) यांनी ह्या पत्रकांन्वये केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *