ताज्या बातम्या

एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा राळेगण सिद्धी येथे उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून झाला सन्मान

एरंडोल – येथील माहिती अधिकार कार्यकर्ता राजधर महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांचा राळेगण सिद्धी येथे माहिती अधिकाराचे जनक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विज्ञान पाटील यांना राज्यात उत्कृष्ट पत्रकारिता केल्या बद्दल उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मान करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन यांनी घेतलेल्या दुसऱ्या अधिवेशनात एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ता राजधर महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष बसवेकर, शेखर कोलते व यशदाचे विवेक वेलणकर, दादू बोळे, रेखा साळुंखे यांच्या उपस्थितीत शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विवेक वेलणकर यांनी रस्त्यावर स्पीड ब्रेकर कसे व कोणत्या मापात असावे ?, शेतकऱ्यांचे व घरगुती विज वापर करणार्‍याची लाईट किती तास जाते, डीपी जळाल्यानंतर केव्हा बसवली जाते ? यावर वेळेचे बंधन असून त्यानंतर वीज ग्राहकाला वीज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते अशाप्रकारे अनेक उदाहरण दिले. दादू बोळे यांनी अर्ज कसे करावे ? त्यानंतर अपील कसे करावे ? याबद्दल माहिती दिली.  रेखा साळुंखे यांनी प्रशिक्षित कसे व्हावे ?, प्रशिक्षण घेताना कशाप्रकारे अर्ज कसे लिहावे ? याबद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सुभाष बसवेकर यांनी ज्यांना सन्मानचिन्ह नाही मिळाले. त्यांनी नाराज न होता पुढे उत्कृष्ट कार्य करून सन्मान चिन्ह मिळवू या आशेने जोमाने कार्य करावे असे सांगितले. सत्कारार्थी राजधर महाजन व विज्ञान पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *